पुणे हिंजेवाडी विभागा मध्ये दैनंदिन वाहतूक कोंडी मुळे नैराश्य
पुणे हिंजेवाडी मध्ये दैनंदिन वाहतूक कोंडी मुळे आयटी विभाग आणि इतर कामगारांमध्ये नैराश्य
पुणे हिंजेवाडी मध्ये फेस वन ते फेस थ्री पर्यंत मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे तब्बल तीन वर्षापासून हे काम सुरू आहे त्यामुळे रस्ते अरुंद आणि निमुळते झालेले आहे. यामुळे आयटी कामगारांना वाहतूक करताना फार त्रास सहन करावा लागतो अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरासाठी वाकड ते फेस थ्री फेस टू पर्यंत तब्बल एक तास वेळ लागत आहे. त्यामुळे आयटी कामगारांची ही यातना आहे की लवकरात लवकर मेट्रोचे काम पूर्ण झाले पाहिजे आणि रस्ता हा रुंद झाला पाहिजे जेणेकरून त्यांचा वेळही वाचेल आणि ते घरी सुखरूप पोहोचतील शहरापासून. हिंजेवाडी आयटी पार्क हे जवळ जवळ 25 ते 30 किलोमीटर वर आहे या पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरासाठी आयटी कामगारांना तब्बल दीड ते दोन तास लागतात. तसेच शहरात ही मेट्रोचे काम चालू आहे शहरांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे आणि मधोमध ड्रेनेजचे खड्डे व गढुळ पाणी वाहत आहे.