स्वयं प्रेरणा विकास संस्थेच्या वतीने एम पी सी बी वर धरणे आंदोलन
अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
स्वयं प्रेरणा विकास संस्थेच्या वतीने एम पी सी बी च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. भ्रष्ट व कामचुकार तसेच महिलांशी चुकीच्या पद्धतीने वर्तवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या वतीने लेखी स्वरूपात पत्र मिळाले कि येत्या ७ दिवसात त्या अधिकर्त्यांवरती कार्यवाई करण्यात येईल. या आंदोलनाला स्वनिधान ग्रुप आणि महा विकास समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आले. त्यावेळी हलिमा ताई शेख संस्थापक अध्यक्ष स्वयं प्रेरणा विकास संस्था, सचिन भाऊ गजरमल अध्यक्ष स्वनिधान ग्रुप, कमरुनिसा शेख अध्यक्ष प महाराष्ट्र महा विकास समिती, राकेश सोनावणे संस्थापक स्वनिधान ग्रुप, प्रवीण सोनावणे प्रदेश प्रवक्ता, सागर जगताप शहराध्यक्ष, मुदस्सर शेख प्रदेश उपाध्यक्ष, तुषार पवार, अजिंक्य थोरवे, शमा शेख तसेच अनेक पदाधिकारी आणि MVS NEWS चे मुख्य संवाददाता जावीदमिया जहागीरदार हे उपस्थित होते.