अलखैर मल्टिपर्पज फाऊंडेशन बीड संचालित पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण.
पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण मधील विद्यार्थ्यांचा बीड पोलीस दलात भरती झाल्या बद्दल सत्कार
अल्ताफ शेख ✍️ : अलखैर मल्टिपर्पज फाऊंडेशन बीड संचालित पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यामधील विद्यार्थ्यांचा बीड पोलीस दलात भरती झाल्या बद्दल सत्कार कार्यक्रम ठेवला गेला होता. त्यात निवड झालेले विद्यार्थी शेख फारूक फुलपाशा, सय्यद अफरान, सय्यद अस्लम, सय्यद शाहेद, गणेश जाधव, प्रशांत जोजारे, शेख नाझीम, सय्यद रऊफ, शेख तरनुम या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान पत्र व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अँड शफीक भाऊ म्हणाले अल खैर फाऊंडेशनला पाठबळ द्यायला पाहिजे. जेणे करून ते होतकरू विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करतील. शाकेर भय्या म्हणाले अलखैरच्या कामाला सलाम. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अँड शफीक भाऊ, सय्यद शाकेर भैय्या, मुखीद लाला, अझहर इनामदार,शेख इसहाक, अशोक शिराले सय्यद सिराज, संघर्ष गोरे व अल खैर टीम उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी अल खैर फाऊंडेशन चे अध्यक्ष अझहर इनामदार यांचे सत्कार केले.