महा विकास समितीच्या वतीने मुस्लिम आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा
फरीद शेख प्रतिनिधी: अल्पसंख्यांक विकास महासंघच्या आरक्षण आंदोलनासाठी जाहीर पाठिंबा
अल्पसंख्यांक विकास महासंघचे संस्थापक अध्यक्ष रफिकभाई कुरेशी हे मागील ९ दिवस पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे अल्पसंख्यांक मुस्लिम आरक्षणसाठी धरणे आंदोलन करीत आहे. आंदोलन ही आजच्या काळाची गरज असल्याने रफिकभाई कुरेशी हे समाजाची व अल्पसंख्यांकांची बाजू मांडीत आहे. त्यांच्या या कार्याला महा विकास समिती संस्थापक डॉ. सॉलोमोनराज भांडारे यांनी जाहीर पाठींबा दिला. त्यावेळी त्यांनी सांगितले कि सर्व समाजाला न्याय मिळाले पाहिजे त्यासाठी अल्पसंख्यांक विकास महासंघचे संस्थापक अध्यक्ष रफिकभाई कुरेशी यांनी केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगितले. त्यावेळी महा विकास समितीचे अध्यक्ष राजू मुत्तूमारी, कमरुनिसा शेख अध्यक्ष प. महाराष्ट्र, जावीदमिया जहागीरदार अध्यक्ष PCMC, फरिद शेख उपाध्यक्ष PCMC, तसेच अल्पसंख्यांक विकास महासंघचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.