क्राइमधर्ममहाराष्ट्र

विशालगढ़ दंगल प्रकरणी येथील स्थानिक समाजाला संरक्षण देण्याची मागणी

मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांची पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र (IG), कोल्हापुर पोलीस अधीक्षक(SP) यांची आढावा बैठक

अल्ताफ शेख✍️ : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर समजकटकांनी तलवारी नाचवून तसेच दगडफेक करून समाजविघातक कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने करण्यात आली. विशाळगडावरच्या अतिक्रमण बाबत आंदोलन सुरू असताना काही समाजकटकांनी गडावरील निरपराध मुस्लिम बांधवाना लक्ष्य करत दगडफेक केली तसेच तलवारीच्या धाकाने दमदाटी करत त्याना मारहाण केली.यात लहानथोर मंडळी जखमी झाली.हतबल पोलिसासमोरच हा प्रकार घडला.समजकटकांनी विशाळगड आणि पायथ्याजवळच्या गजापूर गावातील मस्जिदची नासधूस केली.
समजकंटक खुलेआम पोलिसांना जणू आव्हान देतच मस्जिदवर हल्ला चढविला.तयाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.वास्तविक गजपुरची मस्जिद ही अतिक्रमणित नाही तरीही हल्लेखोरांनी हल्ला चढवून समाजविघातक कृत्य केल्याने त्यांचा निषेध करता येईलच पण यातील संशयित गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा अधीक्षक, तसेच जिल्हयाचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित सर यांची भेट घेऊन केली आहे घटना घडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर येऊन परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.तसेच नुकसान झालेल्या परिसरात पंचनामे सुरू असून ,समाजकंटकावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. अन्याय पिढीत लोकांना तसेच प्रार्थना स्थळाची नासधूस करून मोठी हानी केल्याबद्दल नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचेही माहिती मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी यांना दिली. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियांन पठाण, इमरान बेग, मौलाना साहिल देशनुर, सिकंदर जमादार, काशिम मुलानी,हाफिजी असलम मुजावर(कागल), हाफिज मकतुम (हातकंणगले),अखलाक मुंशी(कोल्हापूर) यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

MVS News

MVS NEWS का एक ही लक्ष है आओ मिलकर अन्याय के खिलफा आवाज उठाएं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!