राजनीतिलोकल न्यूज़
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन
शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात निषेध सभा घेण्यात आली.
जाविदमिया जहागीरदार✍️: लोकसभेच्या सभागृहात जातनिहाय जनगणनेची मागणी करणा-या विरोधी पक्ष नेत्याची जात विचारून देशातील समस्त बहुजनांचा अवमान करणा-या. देशात चातुर्वर्ण्य व्यवस्था आणू पाहणाऱ्या मनुवादी वृत्तीच्या भाजप विरोधात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी चौक येथे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी बहुसंख्येने शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे तसेच सर्व फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.