सरकार मान्य शिधा वाटप यांच्या निष्काळजी पणा व आगळेवेगळे टाईम-टेबल मुळे नागरिक त्रस्त
पिंपरी बौद्धनगर येथील सरकार मान्य शिधा वाटप (राशन दुकान) यांच्या निष्काळजी पणा आणि आगळेवेगळे टाईम-टेबल मुळे स्थानिक नागरिक खूप त्रस्त
जाविदमिया जहागिरदार ✍️: पिंपरी बौद्धनगर येथील सरकार मान्य शिधा वाटप (राशन दुकान) यांच्या निष्काळजी पणा आणि आगळेवेगळे टाईम-टेबल मुळे स्थानिक नागरिक खूप त्रस्त. या पिंपरी बौद्धनगर येथील सरकार मान्य शिधा वाटप करणाऱ्या दुकानदाराचे जगावेगळे टाईम-टेबल आहे. तसेच किमान २-३ महिन्यातून कधीतरी १ ते २ दिवस राशन वाटप करतात तेही सायंकाळी ५ ते रात्री ८ असे त्यांची वेळापत्रक आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना भरपूर त्रास सहन करावे लागते आणि त्यासाठी युद्ध पातळीवर पळापळ करावी लागते. तसेच पिंपरी बौद्धनगर येथील सरकार मान्य शिधा वाटप करणाऱ्या दुकानदाराचे नाव आणि सरकार मान्य शिधा वाटपचे क्रमांक देखील कुठेही उल्लेखनिय फलक दिसत नाही. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे कि सदरील दुकानदार हा २-३ महिन्यातून १ ते २ दिवस राशन वाटप करतो त्यासाठी त्यांना भरपूर त्रास होत आहे. पिंपरी बौद्धनगर येथील सरकार मान्य शिधा वाटप करणाऱ्या दुकानदाराशी विचारपूस केली असता त्यांना दरमहा सरकार मार्फत राशन मिळत असते. तरी ते देत नाही आणि त्यांना टाईम-टेबल बाबत विसरले असता ते म्हणाले कि आमचा सायंकाळी ५ ते रात्री ८ हाच टाईम-टेबल आहे. आम्ही इतर टाईम-टेबल मध्ये येत नाही. स्थानिक लोकांची तक्रार व मागणी आहे कि मा. तहसीलदार साहेबांनी या राशन वाटप दुकानदारावर कठोर कायदेशीर कार्यवाई करावी आणि सरकार मान्य वेळेत राशन मिळावे याची सुविधा करण्यात यावी अशी विनंती करीत आहेत.