दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विविध घडामोडींबद्दल चर्चा केली गेली
दिनांक: 28/11/2024, प्रतिनिधी, अल्ताफ शेख
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार साहेब, सुप्रिया ताई सुळे, सोलापूर जिल्ह्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, भिवंडीचे खासदार बाळ्या मामा आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांसाठी असलेली धोरणे, अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली.
दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विविध घडामोडींबद्दल चर्चा केली गेली. शरद पवार साहेब यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मुस्लिम समाजावर होणारे वारंवार हल्ले, अपमान आणि अन्याय यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मुस्लिम समाजावर होणारा अन्याय आणि नितेश राणे यांचे अपमानजनक वर्तन यावर सर्व खासदारांना एकत्र येऊन योग्य पावले उचलावीत, अशी विनंती करण्यात आली. यासाठी कडक कायद्या अंतर्गत कारवाई केली जावी, हे सूचित केले गेले.
तसेच, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना समाजामध्ये मिळणाऱ्या अपमानापासून वाचवण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे महत्व सांगितले. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
हा मुद्दा लोकसभेच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव हलीम ताई शेख, सोलापूर अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष वारिस कुंडले, प्रसिद्धीप्रमुख लाडजी नदाफ यांनाही ही माहिती दिली आहे.