राजनीति
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुस्लिम जमात तर्फे महाविकास आघाडीला पाठिंबा
दिनांक- 18/11/2024, प्रतिनिधी- जावेद जहागीरदार
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुस्लिम जमात तर्फे पिंपरी विधानसभेचे उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर, भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित दामोदर गव्हाणे, चिंचवड विधानसभेचे उमेदवार राहुल तानाजी कलाटे या तीनही महाविकास आघाडीचे उमेदवार यांना पिं. चिं. मनपाचे मा. माहापौर मा. आझमभाई पानसरे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली सर्व मुस्लिम समाजाचा वतीने पाठिंबा देण्यात आला.