लोकल न्यूज़
कुदळवाडी परिसरातिल रोहिंग्या बांगलादेशी नाहीत, भंगाराच्या गोदामात काम करणारे बिहार आणि उत्तर प्रदेश येथील मुस्लिम आहेत असा दावा चिखली पोलिसांनी केला आहे
पुणे प्रतिनिधी -जावेद जहागिरदार
कुदळवाडी परिसरातिल रोहिंग्या बांगलादेशी नाहीत, भंगाराच्या गोदामात काम करणारे बिहार आणि उत्तर प्रदेश येथील मुस्लिम आहेत असा दावा चिखली पोलिसांनी केला आहे.
सोमवारी दि ९/१२/२०२४ रोजी कुदळवाडी येथील भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. या परिसरात मोठीमोठी भंगाराची गोदामे असून त्यामध्ये रोहिंग्या बांगलादेशी वास्तव्य करीत असल्याचा मुद्दा स्थानिक भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत उपस्थित केला. याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंके म्हणाले की, कुदळवाडी परिसरात काम करणाऱ्या कामगारांची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात नसते. ही नोंद करण्याची जबाबदारी कामगार कल्याण विभागाकडे असते. मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार वारंवार होणाऱ्या कोंबिंग ऑपरेशनच्या वेळी या कामगारांची चौकशी केली जाते. हे कामगार कोठून आले आहेत याबाबत चौकशी करताना त्यांचे आधारकार्ड किंवा गावाकडची शिधापत्रिका पाहिली जाते. हे काम स्थानिक पोलिसांकडून केले जाते.पोलीस आयुक्तालय स्तरावर एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) काम करते. या पथकाने काही महिन्यांपूर्वी भोसरी परिसरातून काही बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. हे पथक वारंवार कुदळवाडी परिसरात चौकशी करीत असते. याशिवाय पोलीस ठाणे स्तरावरही दहशतवाद विरोधी पथक असते. या पथकाकडूनही वारंवार परदेशी नागरिकांची माहिती संकलित केली जाते. जर कुदळवाडी परिसरात रोहिंग्या बांगलादेशी असते तर वारंवार केलेल्या चौकशीमध्ये काही ना काही माहिती हाती आली असती.