पुनावळे येथील एका विधवा महिलेला बिल्डर आणि गुंडवृत्तीच्या लोकांपासून धमकी……..
पुनावळे पुणे येथील एका विधवा महिलेला बिल्डर आणि गुंडवृत्तीच्या लोकांपासून धमकी....

पुनावळे पुणे: मंगल रंगनाथ सावळे नामे महिला सर्व्हे नं. 12/1 पुनावळे पुणे येथे सुमारे ३५ वर्षा पासून राहत आहे. त्याठिकाणी जुने जागा मालक नामे धनाजी कामठे आणि रामजी कामठे यांच्या मालकीची प्रत्येकी २.५ एकर जागेवर शेती करत होते आणि त्यातून होणाऱ्या उत्पन्न हे मालकांना देत असे तसेच महिलेला एक एकर जागा देण्याचे सांगितले होते. म्हणून सदरील महिलेचे पती हे MSEB मध्ये कामाला होते त्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे धनाजी कामठे आणि रामजी कामठे मालकांना दिले. त्यामुळे महिला व तिचे पती हे दिवस रात्र शेतीवर मेहेनत करत असे आणि त्याबाबत ते कोणतेही पैसे घेत नव्हते आणि काटकसरीने जीवन जगत होते. अचानक काही दिवस पूर्वी नवीन जागा मालकाची माणसे व गुंडवृत्तीचे व्यक्ती येऊन महिलेला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. म्हणून महिलेने रावेत पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी अर्ज केली. परंतु पोलीस प्रशासना कडून कोणतेही न्याय मिळले नसल्याची कबुली सदरील महिलेने केली आहे. उलट पोलीस प्रशासन महिलेलाच धमकी देत असल्याचे सांगितले आहे. अनेक गुंडवृत्तीचे व्यक्ती रात्रीअपरात्री येऊन धमकावीत असल्याचे सांगितले आहे.
मंगल रंगनाथ सावळे नामे महिलेला पोलीस प्रशासना कडून किती न्याय मिळेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.