क्राइमटॉप न्यूज़महाराष्ट्र

पाकिस्तानचा आहेस का म्हणून मारहाण,लातूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दिनांक ५ मे २०२५ : अल्ताफ शेख,पुणे

लातूर येथील संविधान चौकात एका चार चाकीतून आलेल्या पत्रकाराने एका तरुणास तु काश्मिरहून आलास का पाकिस्तानचा आहेस म्हणून त्याला अवघड ठिकाणी मारहाण करुन मारहाणीचे व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सदरील तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी पत्रकाराच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताची पत्नी समरीन अमिर पठाण वय २९ वर्षे रा. ख्वॉजानगर खाडगावरोड लातूर यांनी समक्ष पोलीस ठाणे एमआयडीसी, लातूर येथे हजर राहून माझे मयत पती अमिर, सासु हसीनाबी, दिर सलमान, जाउ अंजुम, मुलगी आयशा वय २ वर्ष, असे मिळून एकत्र राहतात. मी एक्सीस बैंक शाखा धाराशिव येथे डेप्युटी मॅनेजर म्हणून गोल्डलोन विभागात खाजगी नोकरी करते तसेच माझे पत्ती एअरटेल टेलीकाम कंपनी, औसारोड लातूर येथे कस्टमर रीलेशनशीप मैनेजर म्हणून खाजगी नोकरी करून कुटुंबाची उपजिवीका भागवितात.

माझे पती नेहमी मला ड्युटीवरून ये-जा करणेकामी राहत्या घरुन संविधान चौकपर्यंत दुचाकीवर आणून सोडतात व घेऊन जातात. दि. ३ मे रोजी रात्री ८.४५ ते ९.१५ वाजण्याच्या सुमारास मी नेहमी प्रमाणे धाराशिव येथे ड्यूटी करून वसने लातूरला पाचनंबर चौक येथे आले असता मी माझे मा क्र ८८ ०५१०७७५८ वरून त्यांचा मो. क्र ९३५६४४०७४५ वर संपर्क करून मला संविधान चौक येथे घेणेकामी या, असे फोनवर बोलत असताना त्यावेळी माझे पती अमिर गफुर पठाण वय ३० वर्ष हे माझी काही चुक नाही मला मारु नका, असे कोणालातरी विनंती करत बोलत होते. त्यावेळी पुढच्या व्यक्तीने मी पत्रकार आहे तुझे नाव काय? तु कश्मीरहून आला आहेस का?, तु पाकीस्तानचा आह-से का? असे म्हणून माझ्या पतीला मारहाण केल्याने त्यांचा मोठ्याने किचाळण्याचा आवाज येऊ लागला व समोरचा व्यक्ती मी तुझे फोटो आणि व्हीडीओ काढला आहे, तो मी फेसबुक व वाट्सअॅपवर व्हायरल करतो, असे म्हणत होता, तेव्हा माझे पती माझे व्हीडीओ, फोटो कोठेही व्हायरल करु नका मी कश्मीर किंवा पाकिस्तानचा नाही, असे मोठ्याने विनंती करत होते.

हा संपूर्ण प्रकार चालू असताना माझा व पतींचा फोन चालू होता. मी पाण्याची टाकी संविधान चौक येथे बसमधून उतरले, तेव्हा माझे पती तेथील फुलाचे दुकानाजवळ घावरलेल्या स्थितीत उभे होते व त्यांचे भोवती भरपुर गर्दी जमा झाली होती. त्यांचे शर्टचे बटने तुटलेली होती. त्यावेळी मी त्यांना काय झाले, असे विचारले असता त्यांनी समोर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या किया कंपनीची गाडी जिचा क्र. एम. एच. २४ बीआर ७००८ कडे इशारा करुन सांगीतले की, मी तुला घेणेसाठी पाण्याच्या टाकीजवळ उभा असताना या गाडीतल्या अनोळखी इसमाने माझ्या जवळ गाडी थांबवून गाडीतून उतरुन मला शिवी देवून विचारले की, तुझे नाव काय आहे,तेंव्हा मी माझे नाव अमिर पठाण आ हे, असे सांगीतले तेव्हा त्याने माझ्या शर्टला घरुन तु कश्मीरहुन आला आहेस का, तु पाकिस्तानचा आहेस का, असे म्हणून मारहाण केली व माजी पैन्टू काढून माझ्या अवघड जागेवर मारले व माझे फोटो व व्ह ौडीओ पण काढला. सदर इसमाने मी पत्रकार आहे. आता तुझे फोटो व व्हीडीओ पाकिस्तानी आहेस म्हणून फेसबुकवर व वाट्सअॅपवर व्हायरल करतो, अशी धमकी दिली. तेंव्हा मी त्यांना माझे फोटो व्हीडीओ व्हायरल करु नका, अशी विनंती केली पण त्याने काहीच एकले नाही असे सांगीतले.

मी सदरची गाडी व त्यातील अनोळखी इसमाला बधितले तेवढ्या वेळात सदर आनोळखी इसम आपली गाडी घेऊन तेथून निघून गेला. माझे पती मला आपण पोलीसात जाऊन तक्रार देऊ असे म्हणाले असता मीच आपन उद्या नाऊन तक्रार देऊ असे म्हणाले, आम्ही तेथून घरी आलो. माझे पती मला म्हणाले की, मी काय पाकिस्तानचा आहे का? मला विनाकारण त्या इसमाने माझा अपमान करुन मला मारहाण केली. मला खुप टेंशन आले आहे, असे सारखे म्हणत होते. त्यांनी त्याच टेंशनमध्ये त्यांच्या मित्रांना फोन करून सदरची घटना सांगीतली. ते रात्रभर जेवन न करता जागेच होते. मी त्यांना झाले ते जाऊ, तुम्ही टेंशन घेऊ नका, असे म्हणाले तरी मी भारतीय असून मला विनाकारण तू पाकिस्तानचा आहे, असे म्हणून मारहाण करुन माझा अपमान केला व माझे फोटो व व्हीड  ीओ व्हायरल करती, तु पाकिस्तानचा आहे, असे म्हणून धमकी दिली मला आता जगावेसे वाटत नाही असे सा रखे म्हणत होते.

दि. ४ में रोजी सकाळी उठून सारखे ते मोबाईलवर त्यांचे फोटो व व्हीडीओ व्हायरल झालेत का ते भितीपोटी वारंवार चेक करत होते. सदर इसमाने त्याना मारहाण करतेवेळी स्कुटीचे नुकसान केले होते त्यामुळे दुपारी माझे पती स्क टी दुरुस्त करुन दुपारी ४ वाजता घरी आले. तेव्हा सुध्दा ते कालचे घटनेमुळे टेशनमध्येच होते. रात्री ८ वा. आमच्या गल्लीमध्ये वलीमाचा कार्यक्रम असल्यामुळे माझ्या पतीने घरातील सर्वांना तुम्ही कार्यक्रमाला पुढे जा मी पाठीमागून येतो असे म्हणाले ने मी माझी सासु, जाऊ, दिर वलीमाच्या कार्यक्रमाला गेलो. रात्री ९ वाजणेचे सुमारास आम्ही कार्यक्रमावरुन घरी आलो तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. मी माझ्या बेडरुममध्ये जाऊन पाहीलेअसता छताच्या लोखंडी कडीला ओढणीच्या साह्याने फाशी घेतल्याचे दिसले. मी जोरात ओरडल्याने माझी सासु, जाऊ व दिर बेडरुममध्ये पळत आले. आम्ही त्यांना ओढणी कापून खाली घेतले तेव्हा त्यांचा घसा घरघर करत होता व तोंडातुन लाळ बाहेर येत होती. त्यावेळी आम्ही माझे पतीस ऑटाने तात्काळ राचमाळे हॉस्पीटलमध्ये घेऊन गेलो, तेथील डॉक्टरांनी चेक करून माझे पती यांना सरकारी दवाखाना लातूर येथे घेवुन जाण्यास सांगीतले. त्यानंतर आम्ही राचमाळे हॉस्पीटल येथील अॅमबुलन्समध्ये माझे पतीस घेऊन सरकारी दवाखाना लातूर येथे घेऊन गेलो तेंव्हा तेथील डाक्टरांनी रात्री ११.३० वाजता माझे पती हे मयत झालेचे सांगीतले. तरी माझे पतीचे मरणास कारणीभुत अनोळखी पत्र कार व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करून न्याय दयावा ही विनती, मी माझ्या पतीच्या मरणास कारणीभुत आनोळखी इसमास व तो वापरत

असलेले वाहन पुन्हा पाहील्यास ओळखु शकते, असा जवाब दिल्याने पोलिसांनी अनोळखी पत्र कारा विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एमआयडीसी पोलीसांकडून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!