क्राइममहाराष्ट्रलोकल न्यूज़
पुण्यात काका-पुतण्याने मिळून १७ वर्षीय कोमलची केली निर्घृण हत्या.
पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने वार करून निर्घृण हत्या

पुणे १२ मे २०२५: वार्ताहर,अल्ताफ शेख
पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची काल (रविवारी) रात्री चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही हत्या कोमल भारत जाधव या तरुणीची असून, तिचा मामा उदयभान यादव आणि त्याचा पुतण्या अभिषेक यादव यांनी मिळून ही अमानुष कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दोघा आरोपींना काही तासांत अटक केली असून, प्राथमिक तपासात हे समोर आले आहे की कोमल आणि उदयभान यांच्यात काही आर्थिक व्यवहारांवरून वाद निर्माण झाला होता.
वाद इतका वाढला की संतप्त झालेल्या उदयभानने आपल्या पुतण्याच्या मदतीने कोमलवर धारदार चाकूने वार केले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.





