समस्त ख्रिस्ती समाज तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन
पुणे ख्रिश्चन फोरम व समस्त ख्रिस्ती समाज तर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध!

दिनांक 17 जून 2025 रोजी सांगली (कुपवाड) येथील मशाल मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना उद्देशून अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्याचे निषेधार्थ आज रोजी पुणे ख्रिश्चन फोरम व समस्त ख्रिस्ती समाज तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी हजारोच्या संख्येने समस्त ख्रिस्ती समाज हजर होते. अनेक मान्यवरांचे भाषण झाले आणि पुणे ख्रिश्चन फोरम व समस्त ख्रिस्ती समाज तर्फे पुणे जिल्हाधिकारी यांना मागणी पत्र देण्यात आले.
१. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा
२. त्यांच्या आमदार पदाची रद्दबातल कार्यवाही तात्काळ व्हावी
३. ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणाची CID चौकशी व्हावी
४. समाजात भीती निर्माण करणाऱ्या वक्तव्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
त्यावेळी आयोजक फा. रॉक अल्फान्सो, राजेश केळकर, बिशप आल्फ्रेड तिवडे, नरेंद्र गायकवाड, विल्सन भोसले, अतुल नाडे, सतीश पटेकर, नाथान हुंबरे, प्रविण पाटोळे, रॉबिन रायचूर, जिजॉय वर्गीस, रि. कर्नल निलेश साळवी आणि अनेक ख्रिस्ती धर्मगुरु व हजारोच्या संख्येने ख्रिस्ती समाज तसेच अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.