टॉप न्यूज़देशमहाराष्ट्रलोकल न्यूज़
महापालिकेच्या शाळेतून जर्मनीपर्यंत – श्रावणी टोणगेची प्रेरणादायी कहाणी
कु. श्रावणी टोणगे पिंपरी-चिंचवडची जागतिक शिखर सर करणारी कन्या!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थिनी कु. श्रावणी टोनगे हिने थेट जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) रॉबर्ट बॉश महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे तिला तब्बल १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
अशी अभिमानास्पद कामगिरी करणारी श्रावणी ही महाराष्ट्रातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब आहे.
महापालिका आयुक्त मा. शेखर सिंह यांनी कासारवाडी येथे श्रावणीच्या घरी जाऊन तिचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रावणीचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार.





