बोगस पत्रकाराचा देहूरोडमध्ये पर्दाफाश-श्रीजित रमेशनवर 13 गुन्हे दाखल असल्याची माहिती

देहूरोड : नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड परिसरात श्रीजित रमेशन नावाचा एक बोगस पत्रकार कार्यरत असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीने केवळ स्वतःचा भय आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी बॅनर / विडिओ तयार करून, एकतर्फी बातम्या प्रकाशित करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पोर्टलवर कोणालाही न्याय मिळावा किंवा सामाजिक कार्यांचे कौतुक व्हावे अशा प्रकारच्या कोणत्याही बातम्या दिसून आल्या नाहीत. उलटपक्षी, तो लोकांमध्ये दहशत निर्माण करून आणि खोटी प्रसिद्धी करून पैशांची उकळपट्टी करतो, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात “विषय गंभीर” चे संस्थापक अध्यक्ष देशपांडे यांनी सांगितले की, “सदर व्यक्तीचे कोणतेही वैध उत्पन्नाचे साधन दिसत नाही. त्यामुळे त्याचे हे वर्तन संशयास्पद असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.” तसेच, सदर श्रीजित रमेशन याच्यावर सध्या तब्बल 13 गुन्हे दाखल असल्याचे देखील सांगितले आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखीनच वाढली आहे.




