पूरग्रस्त ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप-मराठी मुस्लिम समाज चळवळ यांचा उपक्रम

मराठी मुस्लिम समाज चळवळ यांच्या वतीने आज माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेळगाव येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत गरजू व ग्रामीण विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेना आणि इतर आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनांची मदत करणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शिक्षक व पालक वर्गाने संस्थेच्या या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
मराठी मुस्लिम समाज चळवळ ही फक्त मदतीची संस्था नसून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक दीप ठरावी, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
या उपक्रमात मराठी मुस्लिम समाज चळवळचे कार्यकर्ते
साजीद सिराजखान, इस्माईल शेख, अब्दुर्रहमान मलिक, हकीम भाई आणि आदम चौधरी
हे सक्रिय सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवली.
समाजातील अनेक बांधवांनी आर्थिक व साहित्याच्या स्वरूपात मदत करून या कार्यात सहभाग नोंदवला.
त्यांचे सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय
मोईनोद्दिन शेख (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, मराठी मुस्लिम समाज चळवळ) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडले.






