क्राइमलोकल न्यूज़

स्विफ्ट कारमधून आले आणि शाळेजवळून 4 विद्यार्थ्यांचे अपहरण केले; थरारक घटनेतील आरोपींना सिनेस्टाईल पकडले

मलकापूर (जि. बुलढाणा) – मलकापूर शहरातील गांधी चौक परिसरातून आज सकाळी साडेआठच्या सुमारास एक लाल रंगाची स्विफ्ट कार येऊन थांबली. या कारमधून आलेल्या व्यक्तींनी एका 14 वर्षीय विद्यार्थिनीसह तीन शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण केले. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली.
पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच अपहरणकर्त्यांची कार मोताळा शहराजवळ अडवण्यात आली. या कारमधून सर्व चारही अपहृत विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
सध्या अपहरणग्रस्त विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर समुपदेशन आणि आवश्यक उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थी प्रचंड भयभीत झाले होते.
नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांची तत्परता व पाठलागामुळे अपहरणकर्त्यांची कार अडवण्यात यश आले. या कारमधून अपह्रत चारही विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. यावेळी नागरिकांनी अपहरणकर्त्यांना चांगला चोप दिला व कारची तोडफोडही केली. बोराखेडी पोलिसांनी या तिन्ही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं असून हे अपहरणकर्ते कोण आहेत? त्यांनी ही कार कुठून आणली? व आपहरणाचा उद्देश काय? याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या ही बोराखेडी पोलीस स्थानकासमोर नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!