राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मुंबई प्रदेश कार्यालय येथे अल्पसंख्यांक सेलची बैठक संपन्न

दिनांक: ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्यांक सेलची विशेष बैठक मुंबई प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मा. आ. शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
बैठकीला राष्ट्रीय आणि प्रदेशस्तरीय नेत्यांची उपस्थिती लाभली: राष्ट्रीय अध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग) माननीय सिराज मेहंदी साहेब, राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी, नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफ़जलभाई फारूक, नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष वारीस खान, प्रदेश उपाध्यक्ष रहेमा खान, प्रदेश महासचिव कमरुन्निसा शेख, अनेक मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत अल्पसंख्यांक विभागाच्या सध्यस्थितीवर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन, संघटनात्मक पातळीवर सक्षम पदाधिकाऱ्यांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन देण्यात आले.
या वेळी विविध मान्यवरांनी स्थानिक निवडणुकांबाबत आपले विचार व मतप्रदर्शन केले. बैठकीस मोठ्या संख्येने प्रदेश व जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.







