जिल्हास्तरीय कवी संमेलनात बहुजन विचारांची गूंज; साजिद सिराज खान यांचा विशेष सत्कार

दिनांक ७ डिसेंबर रोजी आंबेडकर भवन, चिखली येथे बहुजन विचारधारा मंच आयोजित भव्य जिल्हास्तरीय कवी संमेलन २०२५ उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमी, विचारवंत, तरुण कवी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संमेलनास प्रभाग क्रमांक २चे सामाजिक कार्यकर्ते श्री. साजिद सिराज खान हे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवर कवी, उगवते लेखक तसेच लहान मुलांनी केलेल्या काव्यसादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. या सर्व कवीं व मुलांचा सत्कार श्री. साजिद सिराज खान यांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर बहुजन विचारधारा मंचाच्या वतीने श्री. साजिद सिराज खान यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमातून समता, बंधुता व सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला. संपूर्ण संमेलन प्रेरणादायी व स्मरणीय ठरले. बहुजन विचारधारा मंचाने भविष्यातही असे साहित्यिक व सामाजिक उपक्रम राबवावेत, अशी उपस्थितांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




