E-Paperटॉप न्यूज़महाराष्ट्रलोकल न्यूज़

पुण्यात ज़िल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला विद्यापीठासाठी लक्षवेधी आंदोलन

पुण्यात ज़िल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला विद्यापीठासाठी लक्षवेधी आंदोलन

दिनांक १६ फेब्रुवारी २०२६: शिक्षण हक्क डेव्हलोपमेंट रिसर्च अँड प्रोमोशन मंच यांच्या वतीने मौजे कोंढवा बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्वे क्र. ५५ (आलमगीर मस्जिद ट्रस्ट) येथील ववफ भूखंड महिला विद्यापीठ स्थापनेसाठी नाममात्र भाडे तत्वावर देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अल्पसंख्याक समाजातील मुलींना उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे स्वतंत्र महिला विद्यापीठाची गरज निर्माण झाली आहे. कोंढवा परिसरातील सुमारे दोन लाख लोकसंख्या आणि तेथील शैक्षणिक सुविधांचा अभाव लक्षात घेऊन, सदर जागेत्ता उपयोग महिलांच्या शैक्षणिक उन्नती करण्यात यावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड यांच्याकडे शिक्षण हक्क डेव्हलोपमेंट रिसर्च अँड प्रोमोशन मंच यांच्या मार्फत सादर करण्यात आला आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी कोंढवा परिसरातील अल्पसंख्याक समाजाची सद्यः शैक्षणिक स्थिती लक्षात घेता सदर विषय वक्फ बोर्डाच्या लक्षात आणून द्यावा, या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
या संदर्भातील निवेदन शिष्टमंडळामार्फत निवासी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. दोलनात शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मतीन मुजावर, जिल्हाध्यक्ष चांदभाई बळबट्टी, पुणे शहराध्यक्ष किरण शेख, सचिव शबाना खान, शबाना काझी, शेख शिरीन, आयेशा शेख, जबीन मोमीन, मुस्कान शेख, असमा शेख, सारा सौदागर, अख्तर शेख, तौहीद शेख, मेवा मौलवी, चांदभाई बळबट्टी, हातिम शेख, साबीर तांबोळी, इस्माईल शेख फहीम खान, शेख सादिक शमशुद्दीन, दौलाभाई पिरजादे, अल्ताफ शेख,संदीप शेंडकर, विजय गायकवाड, मोहम्मद हुसेन आबाजी, गुलशन शेख, नावीद शेख, अरिफ कुवारी, ऍड. चंद्रकांत घाणेकर निजामुद्दीन शाह इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!