
गुजरात पोलिसांनी बनावट नोटांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत अहमदाबाद क्राइम ब्रांचला मोठे यश मिळाले आहे. सूरत येथे कार्यरत असलेले बनावट नोटांचे मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात आले असून, या कारवाईत सुमारे ₹२ कोटींहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी एका महिलेसह एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सूरत येथून अहमदाबादकडे बनावट नोटांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. आरोपींकडून ₹५०० मूल्याच्या ४०,००० हून अधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.




