टॉप न्यूज़देशधर्ममहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

ऑल इंडिया उल्मा बोर्ड मूतवल्ली विंगचे पुणे शहर मध्ये पद वाटप करण्यात आली

दिनांक २७/०३/२०२६ रोजी पुणे मध्ये ऑल इंडिया उल्मा बोर्ड मूतवल्ली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल मोहम्मद इकबाल यांनी मा. राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद सिद्दीकी आणि महासचिव अल्लामा बुनई हस्नी यांच्याशी चर्चा करुन मूतवल्ली विंग मध्ये पद वाटप करण्यात आली, त्यात सलीम ए आर बागबान यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमान सलीम बागबान (शिक्षण विभाग) पुणे जिल्हा अध्यक्ष आलमगीर युसूफ कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष सज्जन अय्युब इनामदार, पुणे शहर महिला अध्यक्षा किरण रशीद शेख, उपाध्यक्ष रशिद हुसेन पठाण, अब्बास बागवान, हनीफ पठाण सचिव, सलीम शेख मिडिया पुणे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष जाविदमियाँ जहागिरदार, पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा कमरूनीसा शेख, हुसेन शाहिद शहा तालुका अध्यक्ष शिरूर यांच्या सह मोठ्या संख्येने नियुक्ती करण्यात आली.
या वेळी फैसल मुजावर यांनी सांगितले की भारतातील महाराष्ट्र सह इतर कुठल्याही ठिकाणी वक्फ बोर्डच्या जमीनीचे जतन करने, अनाधिकृत ताबेमारी यासाठी मुतवल्ली, ट्रस्टी, मदरसे, आशुरखाना, कब्रस्तान, चिल्ला, दर्गा, मस्जिद, यतीमखाना अशा प्रकारच्या सर्व प्रकरणात मुतवल्ली विंग पाहिजे ती सर्व अधिकृत रीतीने सदैव मदत करेल. या कार्यक्रमात मध्ये ऑल इंडिया उल्मा बोर्डचे सर्व सेलचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!