E-Paperक्राइमटॉप न्यूज़देशमहाराष्ट्र
कर्नल सोफीया बद्दल वादग्रस्त विधान करणारे भाजप मंत्री विजय शाह अडचणीत
वादग्रस्त विधान करणारे भाजप मंत्री विजय शाह यांच्या विरोधात ४ तासात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश.

कर्नल सोफीया बद्दल वादग्रस्त विधान करणारे भाजप मंत्री विजय शाह अडचणीत,४ तासात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश.
मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह हे कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात कोर्टाने कमालीची आक्रमक भूमिका घेतली असून, सोफिया कुरेशींबाबत केलेल्या विधानाची स्वत:च दखल घेत मध्य प्रदेश हायकोर्टाने विजय शाह यांच्याविरोधात चार तासांच्या आत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश देताना सांगितले की, विजय शाह यांच्यावर तत्काळ एफआयआर दाखल झाली पाहिजे. कोर्टाने या प्रकरणी राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांनाही सक्त आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत एफआयआर दाखल झाली पाहिजे, असे सांगितले.





