पिंपरी चिंचवड शहराचा सुधारित DP प्लॅन नुकताच पालिकेने प्रकाशित केला आहे
PCMC मध्ये अल्पसंख्याक समाजाचा सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने DP प्लॅन मध्ये बदल सुचवले जातील

पिंपरी चिंचवड शहराचा सुधारित DP प्लॅन नुकताच पालिकेने प्रकाशित केला आहे. त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एकही भूखंड आरक्षित केला नसल्याची बाब आकुर्डी प्राधिकरण मुस्लिम समाज विकास प्रतिष्ठान व खिदमत ए आलम वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी व शहरातील जेष्ठ मुस्लिम सामाजिक कार्यकर्ते यांनी मा. आमदार आण्णा बनसोडे यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिली. मुस्लीम समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी, समाजातील तरुणासाठी शैक्षणिक लायब्ररी, समाजाचे धार्मिक कार्यक्रमासाठी, हज ला जाणाऱ्या हज यात्रींसाठी प्रशिक्षण केंद्र, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र यासारख्या सुविधा देण्यासाठी काही भूखंड आरक्षित केले जावेत अशी त्यांची आग्रही मागणी होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पालिकेच्या अधिकार्या सोबत बैठक लावण्यात येणार आहे व शहरातील कोणत्याही अल्पसंख्याक समाजावर अन्याय होणार नाही त्यांचा सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने DP प्लॅन मध्ये बदल सुचवले जातील असे आश्वासन मा. आमदार आण्णा बनसोडे यांनी यावेळी दिले.