टॉप न्यूज़धर्ममहाराष्ट्रराज्य
आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध अल्पसंख्यांक आयोगाला दिले पत्र
सखल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध अल्पसंख्यांक आयोगाला पत्र देण्यात आले

आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिनांक १७ जून २०२५ रोजी दिलेल्या वादग्रस्थ विधानाने पूर्ण महाराष्ट्रात सखल ख्रिस्ती समाजात एक भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून पिंपरी चिंचवड येथील सखल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाई केली जावी म्हणून अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य मा. वसीम बुऱ्हाण यांना पत्र देण्यात आले. मा. वसीम बुऱ्हाण यांनी अश्वासन दिले कि लवकरच योग्यती कायदेशीर कार्यवाई केली जाईल. सखल ख्रिस्ती समाजाच्या वतीने मा. वसीम बुऱ्हाण यांचे सत्कार देखील करण्यात आले. त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते, रेव्ह. डॉ. सोलोमोनराज भंडारे, रेव्ह. राजेंद्र कदम,ब्रो. डेविड काळे, रेव्ह. विल्सन पाटोळे, पास्टर दिगंबर शिंदे तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने कमरुनिसा शेख आणि जावीदमिया जहागीरदार उपस्थित होते.