आयटीआय मध्ये नव्या अभ्यासक्रमाचा समावेश _मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मोठी घोषणा

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आधुनिक ६ नवे अभ्यासक्रम ( न्यू एज कोर्सेंस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे एक ते दोन नवं अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्दैश राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाचे अधिकारी, आयटीआयचे प्राचार्य यांना दिले.
औद्योगिक प्रशिक्षण केंद्र औंध येथे कौशल्य विकास विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील आयटीआयचे प्राचार्य तसेच संस्था व्यवस्थापन समित्यांच्या सदस्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी व्यवसाय प्रशिक्षण सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, कौशल्य विकास आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रतिभा चव्हाण, ओंध आयटीआयचे उपसंचालक सचिन धुमाळ आदी उपस्थित होते आयटीआयच्या विध्यार्थीना आधुनिक काळाची गरज ओळखून नवनवीन कौशल्य शिकविणे ही काळाची गरज आहें. त्या दृष्टीने नवकौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे संबंथित आयटीआयने आपल्या संस्थेत सुरू करावयाच्या अभ्यासक्रमाबाबतचे प्रस्ताव दिल्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. तसेच त्यासाठी निधीनी कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाहीं, याशिवाय आपल्या संस्थेकडे कोणते नवीन आणि आर्थिक मागणी असू शकतील, असे अभ्यासक्रम देखील सुरू करावेत. याशिवाय तीन व सहा महिन्यांचे अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यातून अधिकचे उत्पन्र मिळून संस्थेच्या विकासाला चालना मिळू शकेल, असे मंत्री महोदयांनी सूचना दिल्या.




