पुनावळेतील विधवा महिलेला न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण

महा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष रेव्ह डॉ सोलोमोनराज भंडारे यांनी पुनावळे येथील सर्वे नं. 12 मधील श्रीमती मंगला रघुनाथ साबळे (विधवा), त्यांची विधवा सून व अल्पवयीन नातू यांच्या न्यायासाठी आज रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय निगडी येथे अमरण उपोषणची सुरवात केली.
त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत :
1. रस्ता खुला करावा – भोंडवे यांनी बेकायदेशीरपणे बंद केलेला रस्ता तातडीने खुला करण्यात यावा.
2. शौचालयाची सोय करावी – कुटुंबाचे शौचालय पाडण्यात आल्यामुळे तात्पुरती स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी.
3. सुरक्षा पुरवावी – न्यायालयीन खटला चालू असताना पीडित कुटुंबास जीव व मालमत्तेची सुरक्षा पुरवावी.
4. धोकादायक खड्डा बुजवावा – घराभोवती खोदून पाण्याने भरलेला खोल खड्डा तातडीने बुजवावा.
5. झाडे तोडण्याबद्दल FIR दाखल करावी – बेकायदेशीर झाडे तोडल्याबाबत गुन्हा नोंदवावा.
6. जातीवाचक अपमानाबद्दल गुन्हा दाखल करावा – भोंडवे यांनी विधवा दलित स्त्रीचा अपमान करून म्हटले की, “हे लोक मांग, महार कधी बदलत नाहीत.” हा प्रकार SC/ST अॅट्रॉसिटीज अॅक्ट अंतर्गत गुन्हा ठरतो. यासंदर्भातील तक्रार, पुरावे व व्हिडिओ रावेत पोलीस ठाण्यात आधीच सादर केले आहेत.
7. PCMC अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – संबंधित PCMC ‘ड’ प्रभाग अधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून बेकायदेशीर पाडकाम केले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
एक दिवस पूर्ण झाले तरी उपोषण सुरूच आहे……..




