धर्ममहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
अ व फ प्रभाग जुलूस कमेटी द्वारा मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने जुलूस काढण्यात आले

पिंपरी चिंचवड : “अ” व “फ” प्रभाग जुलूस कमिटीच्या वतीने मदरसातील विद्यार्थ्यांसह शांतता जुलूस काढून ईद-ए-मिलादुन्नबी म्हणजेच महंमद पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मदरसा कंजुल ईमानच्या वतीने देखील जुलूस काढण्यात आले. ही फेरी मदरसा कंजुल ईमान श्रीराम कॉलनी येथून निघून – डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, राहुलनगर मार्गे भक्ती-शक्ती चौक या दरम्यान पार पडली. निगडी पुलाखालील प्राधिकरण पोलिस चौकीसमोरील मोकळ्या जागेत सांगता झाली. यावेळी कुराण पठण व मौलवींचे प्रवचन झाले. कार्यक्रमात मौलवींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर व जुलूस समिती अध्यक्ष आलमबाबा शेख, बाबाभाई, जावीदमिया जहागीरदार, नबी पठाण, रिहाना खान, यासिन भाई, इम्रान भाई, इरफान भाई, सैय्यद जाफर,परवेज अन्सारी तसेच यंग सर्कलचे कार्यकर्ते जावीद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.




