छावणी परिषदाने मागण्या स्वीकारल्याने डॉ. भंडारे यांचे उपोषण संपले
छावणी परिषदाने मागण्या स्वीकारल्याने महा विकास समितीचे अध्यक्ष डॉ. भंडारे यांचे उपोषण संपले

पिंपरी चिंचवड :- छावणी परिषद देहूरोड यांच्या विरूद्ध रेड झोन विषयाला अनुसरून दिं ०८/१०/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता “अमरण उपोषणाला” सुरुवात केली होती. देहूरोड भागात श्रीमंत लोकांना रेड झोनमध्ये बंगल्यांना मंजुरी आणि बांधकामाची परवानगी पण त्याच भागात गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना त्यांच्या छोट्या घरांची दुरुस्ती किंवा बांधकामाचीही परवानगी नाही. तसेच श्रीमंतांना नियम सैल, आणि गरीबांना नोटीस दिल्या जात आहे हे अन्यायकारक असल्याने उपोषण केले होते. त्यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी /संघटनांनी व राजकीय पक्षांनी देखील जाहीर पणे पाठिंबा दिला. त्यानंतर छावणी परिषद देहूरोड यांच्या कडून पुष्पांजली रावत (CEO) यांनी सायंकाळीच्या सुमारास रेव्ह. डॉ. सोलोमोनराज भंडारे संस्थापक अध्यक्ष महा विकास समिती यांना पत्र देऊन त्यांच्या मागण्या मान्य करून तात्काळ कार्यवाही करण्याचे लिखित आश्वासन दिले आहे.




