E-Paperhttps://mvsnews.info/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटेक्नोलॉजीमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

पिंपरी-चिंचवड मध्ये ई-मोजणी व्हर्जन 2 सुरू

पिंपरी चिंचवड : दिवाळीपासून पिंपरी-चिंचवड शहरात ई-मोजणी व्हर्जन 2 ही नवी, जीआयएस आधारित जमीन मोजणी प्रणाली सुरू झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील सिटी सर्व्हे क्षेत्रातील सर्व मिळकतींची मोजणी रोव्हर मशीनद्वारे केली जाणार आहे.

ई-मोजणी व्हर्जन 2 ही पूर्णपणे डिजिटल आणि उपग्रहाधारित प्रणाली आहे. मोजणी पूर्ण झाल्यावर त्या जागेची सॅटेलाइट प्रतिमा गूगलवर पाहता येईल मात्र, सध्या नागरिकांचा प्रतिसाद कमी असून गेल्या महिन्यात फक्त 5 अर्जच प्राप्त झाले आहेत.

रोव्हर मशीन अद्याप उपलब्ध नसल्याने मोजणीचे प्रत्यक्ष काम तात्पुरते थांबले आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

1. वेबसाइटला भेट द्या 👉 https://emojni2.mahabhumi.gov.in

2. लॉगिन करून “नवीन मोजणी अर्ज” हा पर्याय निवडा.

3. आवश्यक माहिती भरून शुल्क ऑनलाइन भरा.

4. मोजणीची तारीख ऑनलाइन मिळेल.

नगर भूमापन अधिकारी अमित ननावरे यांनी सांगितले की: “रोव्हर मिळताच ई-मोजणी व्हर्जन 2 द्वारे मोजण्या पुढील आठवड्यापासून सुरू होतील. नागरिकांनी या प्रणालीचा लाभ घ्यावा व अर्ज ऑनलाइन भरावेत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!