क्राइममहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
अनेक गुन्ह्यांचा सराईत गुंड श्रीजीत रमेशन याच्यावर पुन्हा एकदा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड परिसरात दीर्घकाळ दहशत माजवणारा “सराईत गुंड श्रीजीत रमेशन” याच्यावर “अनेक गंभीर गुन्हे” दाखल असून, देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत नवा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रमेशनने “अँटिसिपेटरी बेल” मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे; मात्र अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. स्थानिक नागरिकांच्या मते, रमेशनची अटक झाल्यास देहूरोड परिसरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसू शकतो. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ व गतीने कारवाई करून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




