Discover Your Passion संदेशासह करिअर गाईडन्स कार्यक्रम पार पडला
ऐश्वर्यम हमारा येथे प्रथमच करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

मोशी येथील ऐश्वर्यम सोसायटीमध्ये ऐश्वर्यम हमारा सोशल वेल्फेअर अससोसिएशनच्या वतीने दिनांक 12/04/2026 रोजी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांची माहिती देण्यात आली तसेच तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमामध्ये लाईव्ह प्रश्नोत्तर सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शंका थेट तज्ज्ञांकडून दूर केल्या.
“Discover your passion. Choose your path. Shape your destiny.” या संदेशासह विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन करण्यातआले. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनिस कुट्टी सर, डॉ. श्वेता खोपडे मॅडम , डॉ. सायमा चोगले मॅडम, डॉ. आशुतोष झुंजार सर, बरून आनंद सर आणि मोहम्मद नईम सर यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअर निवडीबाबत सखोल माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन ऐश्वर्यम हमारा सोशल वेल्फेअर अससोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्बास शेख, फैज अहमद बुदिहल, अमीन सईद, जावेद तांबोळी, यासार मुल्ला, मुफिक शेख, नबील खान तसेच इतर मान्यवरांचे विशेष योगदान लाभले.






