भीमसृष्टीत मुस्लिम समाजाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात सामाजिक ऐक्याचा संदेश
पिंपरी-चिंचवड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक ऐक्याचा संदेश घुमला

पिंपरी-चिंचवड : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने पिंपरी येथील भीमसृष्टी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शहाबुद्दीन शेख, हाजी सय्यद गुलाम रसूल, दहार मुजावर, कमरुनिसा शेख, रूहिनाज शेख, हाफिज मोईन, व्ही. एम. कबीर, साजिद खान, सालार शेख, आमिल सैफी, मौलाना एहसान खान, शाफिल्ला चौधरी, फिरोज तांबोळी, करीम पुना, सुलतान तांबोळी, जावीद जहागीरदार, फरीद शेख, मोईन पुना, अब्बास शेख आदींचा समावेश होता. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांचे महत्त्व अधोरेखित करत सर्व समाजांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव जपण्याची गरज आहे आणि सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्ये समाजात रुजविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.





