क्राइमटॉप न्यूज़लोकल न्यूज़
छावा मराठा युवा महासंघाने गॅस चोरांना पकडून दिले पोलसांच्या ताब्यात.

दि १३ ०७/२०२५ रविवार रोजी भोसरी भागात एक गॅस सिलिंडर देणारा व्यक्ती आपल्या गाडीत गॅस एजन्सीमधून आणलेला सीलबंद गॅस मधून एक-दोन किलो गॅस काढून रिकामा सिलिंडर मध्ये भरून लोकांच्या घरी कमी गॅस पोहोचवित होता त्याची माहिती छावा मराठा युवा महासंघ यांना मिळताच संघाचे पदाधिकाऱ्यांनी नामे गणेश सरकटे, महेंद्र शिंदे, मोईन शेख, विष्णू बिरादार, इस्माईल शेख, रावसाहेब गंगाधरे गजानन बिरादार व गणेश पवार हि सर्व व्यक्ती घटना स्थळी धावघेतली. त्या व्यक्तीला हाताशी धरून त्यांनी पोलिस ठाण्यात नेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केले. पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.




