E-Paperक्राइमटॉप न्यूज़लोकल न्यूज़
देहूरोडमध्ये गोळीबारात रमेश रेड्डी यांचा खून; परिसरात खळबळ

पिंपरी चिंचवड : – काल रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयासमोर अज्ञात हल्लेखोरांनी रमेश रेड्डी यांच्यावर अंदाजे ९ गोळ्या झाडल्या. यापैकी ८ गोळ्या त्यांच्या शरीराला लागल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, मागील वर्षी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रमेश रेड्डी यांचे भाऊ विक्रम गुरूस्वामी रेड्डी (वय ३७, रा. गांधीनगर, देहूरोड) यांचाही गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.




