पुणे कलेक्टर कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांची भेट; S.I.R. संदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

पुणे: – दिनांक 28-04-2026 रोजी कलेक्टर कार्यालय पुणे येथे मा. मालिनी कडसकर मॅडम (उपजिल्हाधिकारी – निवडणूक, पुणे) यांची सौजन्यपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान S.I.R. संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यात आली.
सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, प्रक्रिया आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः 2002 च्या मतदार यादी संदर्भात येणाऱ्या अडथळ्यांवर मार्ग काढण्यासाठी आवश्यक माहिती यावेळी स्पष्टपणे समजावून सांगण्यात आली. यावेळी मा. मालिनी कडसकर मॅडम यांनी अत्यंत संयम, स्पष्टता आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने सर्व मुद्दे मांडले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे SIR प्रक्रियेबाबत असलेले अनेक गैरसमज दूर झाले असून, संबंधित विषय अधिक सुलभ आणि समजण्यास सोपा झाला.
या भेटीस किरण फौंडेशन व विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये किरण आपा शेख, कमरुनिसा आपा शेख, डॉ. नसरीन शेख, जबीन आपा, नौशाद शेख, याकुब कुरेशी, फैसल रिशतेवाला आणि जाविदमिया जहागीरदार यांचा समावेश होता. या भेटीमुळे नागरिकांच्या समस्या समजून घेण्यास आणि त्यावर योग्य दिशेने कार्य करण्यास निश्चितच मदत होणार आहे.





