E-Paperटॉप न्यूज़महाराष्ट्रलोकल न्यूज़

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पुणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा केअर सोशल फाउंडेशनतर्फे भव्य सत्कार

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पुणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा केअर सोशल फाउंडेशनतर्फे भव्य सत्कार

पुणे, दि. १ मे : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त केअर सोशल फाउंडेशनच्या वतीने पुणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. समाजासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. ताज सिद्दीकी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुफ्ती आसिफ आरिफी हे देखील उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमावेळी केअर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अल्ताफ शेख, उपाध्यक्ष शबाना खान, सचिव वसीम मोमिन, कार्याध्यक्ष कमरुन्निसा शेख, महिला उपाध्यक्ष किरण शेख, संयोजक सारा सौदागर तसेच मुर्तुझा अन्सारी, हुजेफा शेख, अय्युब शेख आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत समाजासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!