E-Paperटॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

पुणे महापालिकेत अल्पसंख्याक शाळांच्या प्रश्नांवर शिष्टमंडळाचा धडक मोर्चा

पुणे:- दि. २९ एप्रिल २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून अल्पसंख्याक शाळांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात  शिक्षण हक्क मंच, पुणे यांच्या वतीने शिष्टमंडळाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उपायुक्त मा. वसुंधरा बोर्वे यांची भेट घेतली.
या वेळी शाळांमधील पायाभूत सुविधा, शिक्षकांची कमतरता, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, स्वच्छ पाणी, हवेशीर वर्ग व डिजिटल शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळात अल्पसंख्याक समाजाचे नेते राजन नायर, फिरोज मुल्ला (प्रदेश प्रमुख, रिपाई खरात गट), चाँदभाई बेलबट्टी शेख (जिल्हाध्यक्ष, शिक्षण हक्क मंच) यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली.
चर्चेदरम्यान फिरोज मुल्ला यांनी सर्व मुद्दे मांडून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली, तर राजन नायर यांनी अल्पसंख्याकांवरील भेदभाव व शिक्षणातील समान संधी यावर भर दिला. यावर उपायुक्त वसुंधरा बोर्वे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मे महिन्यात शिक्षक व मुख्याध्यापक भरती करण्याचे तसेच नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी सर्व संबंधितांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळात हलिमा ताई शेख, संदीप शडगे, दौलत पिरजादे, सारा सौदागर, नौशाद शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!