पुणे (आंबेगाव) येथील अमानुष घटनेचा SDPI कडून तीव्र निषेध;
पुणे (आंबेगाव) येथील अमानुष घटनेचा SDPI कडून तीव्र निषेध;

पुणे (आंबेगाव) येथील अमानुष घटनेचा SDPI कडून तीव्र निषेध:
पुणे शहरातील आंबेगाव परिसरात घडलेली एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना समाजातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. उपलब्ध माहितीनुसार, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून म्हशींची वाहतूक करणाऱ्या एका मुस्लिम युवकाला तथाकथित “हिंदुत्ववादी गोरक्षकां”च्या एका गटाने आंबेगाव पोलिस स्टेशनसमोर उघड्या रस्त्यावर अडवून त्याच्यावर अमानुष वागणूक केली. या घटनेत बजरंग दलाशी संबंधित असल्याचा दावा करणारे विराज आनंद सोले, हेमंत गायकवाड व इतर काही व्यक्ती, तसेच तृतीयपंथी आकाश राजू मानिगणी उर्फ बिपाशा यांच्या नेतृत्वाखाली झुंडशाहीच्या जोरावर त्या युवकाच्या तोंडात जबरदस्तीने शेण ढकलून त्याला ते गिळण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप आहे.


ही घटना केवळ एका व्यक्तीवरील अत्याचार नसून मानवी मूल्यांवर आणि संविधानिक अधिकारांवर झालेला उघड अपमान आहे. एखाद्या नागरिकाला अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे हे अत्यंत घृणास्पद, अमानुष आणि कायद्याच्या राज्याला थेट आव्हान देणारे कृत्य आहे. अशा प्रकारची वागणूक कोणत्याही सभ्य समाजात स्वीकारार्ह असू शकत नाही.
अधिक चिंतेची बाब म्हणजे, ही घटना पोलिस ठाण्यासमोर घडल्याचे सांगितले जात असतानाही अद्यापपर्यंत संबंधितांवर ठोस गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी अशा घटनांवर तात्काळ आणि कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
सोशल डेमोक्रॅटिक पार्टीची स्पष्ट मागणी आहे की:
1. या घटनेची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
2. संबंधित सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा.
3. पीडित युवकाला त्वरित संरक्षण व न्याय मिळवून देण्यात यावा.
4. भविष्यात अशा प्रकारच्या झुंडशाहीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
महाराष्ट्र ही संत-महापुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते. अशा अमानुष आणि किळसवाण्या घटना राज्याच्या सामाजिक परंपरेला आणि मानवी मूल्यांना काळिमा फासणाऱ्या आहेत. समाज म्हणून आपण अशा घटनांविरुद्ध ठाम भूमिका घेणे आणि माणुसकीचे मूल्य जपणे ही काळाची गरज आहे.




