अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदची कोंढवा सोमजी महावितरण कार्यालयाला भेट; ग्राहकांच्या समस्यांबाबत तीव्र नाराजी
अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदची कोंढवा सोमजी महावितरण कार्यालयाला भेट; ग्राहकांच्या समस्यांबाबत तीव्र नाराजी

दिनांक : 19-6-2026
अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.हौशिला प्रसाद दुबे सर व राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा.कुलदीप सिंह सर व राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.बाबा गोलंदाज सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सोमजी महावितरण कार्यालयाला भेट देऊन ग्राहकांच्या विविध तक्रारी व समस्यांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान कार्यालयातील कामकाजाबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
भेटीच्या वेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी अथवा अभियंता उपस्थित नसल्याचे आढळून आले. तसेच अनेक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचेही निदर्शनास आले. कार्यालयात केवळ वीज बिल भरण्याची खिडकी सुरू होती. नागरिक आपल्या विविध समस्या व तक्रारी घेऊन कार्यालयात आले होते, मात्र त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी अथवा समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणताही अधिकारी उपलब्ध नव्हता.
विशेष म्हणजे, एका ग्राहकाचे वीज मीटर तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले असून अद्याप नवीन मीटर बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित ग्राहकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकारचा निष्काळजी व भोंगळ कारभार ग्राहकांच्या हिताला बाधा आणणारा आहे.
याशिवाय, ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांबाबत समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेकडून महावितरण प्रशासनाकडे या सर्व बाबींची तातडीने दखल घेऊन ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, शिस्तबद्ध कामकाज आणि ग्राहकाभिमुख सेवा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिषदेने केली आहे.
यावेळी उपस्थित अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद चे पुणे जिल्हा अध्यक्ष मा.जयेश जोजारे,पश्चिम महाराष्ट्र सचिव नसीरुद्दीन पिरजादे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफ शेख व पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष सौ.शबाना खान व कोंढवा विभाग अध्यक्ष मा शोहाब शेख व इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



