E-Paperhttps://mvsnews.info/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़राजनीतिराज्यलोकल न्यूज़
महापालिका (PCMC) मुख्यालयासमोरील मुस्लिम समाजाचे आंदोलन तात्पुरते स्थगित…

पिंपरी, दि. ११ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयासमोर दि. १२ जून रोजी आयोजित करण्यात आलेले मुस्लिम समाजाचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती मुस्लिम समाजाच्यावतीने देण्यात आली आहे.
अवैध धार्मिक स्थळांबाबत राज्य शासनाने स्पष्ट धोरण निश्चित करून प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र आढावा घ्यावा तसेच नियमितीकरणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबवावा, या प्रमुख मागणीसंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजयकुमार सुर्यवंशी यांनी सकारात्मक भूमिका घेत सहमती दर्शविल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनाची स्थगिती शांततापूर्ण पद्धतीने आणि कायदा-सुव्यवस्थेचा पूर्ण आदर राखून करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.




