पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ५ गुन्हेगारी टोळ्यांवरील ४५ आरोपींवर मोका

पिंपरी, प्रतिनिधी : संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण ४५ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. ही कारवाई मे २०२६ महिन्यात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड, काळेवाडी, उत्तर म्हाळुंगे आणि चिखली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांवर ही कारवाई करण्यात आली.
मोका कारवाई झालेल्या टोळ्या व प्रमुख आरोपी
१) आफताब समीर शेख टोळी (देहूरोड) टोळी प्रमुख, प्रमुख आरोपी : रेहान रियाज तांबोळी, सिद्दीक सलाम शेख, मोहम्मदअली शकील शेख, अरमान हुसेन शेख, मोहम्मद सिद्दीक अताउर रेहमान शेख, नौशाद नजीर शेख. टोळीवर १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद.
२) साबीर समीर शेख टोळी (देहूरोड) टोळी प्रमुख, प्रमुख आरोपी : निखील ऊर्फ लखन आगळे, अरमान हुसेन शेख, नौशाद नजीर शेख, अन्वर उमर शेख, संदिप तेलगु, अहमद उर्फ टिल्या मोकाशी, रितेश जाधव, आफताब शेख, साईप्रेम चित्तामल्ला, शाहीद शेख, मदन स्वामी, ओमकार चौगुले, अमरीन शेख यांच्यासह अन्य आरोपी. टोळीवर १९ गंभीर गुन्ह्यांची नोंद.
३) विकी शंभुलिंग सुतार टोळी (काळेवाडी) टोळी प्रमुख, प्रमुख आरोपी : अभिषेक मांडगुळे, बाबुराव पाटील, महेश गिरासे. टोळीवर ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद.
४) सागर बाळू जावळे टोळी (उत्तर म्हाळुंगे) टोळी प्रमुख, प्रमुख आरोपी : नितीन थिटे, सौरभ उर्फ सोन्या ढोरे, कुणाल चव्हाण, अजय गोपाळे, ओमकार कोरडे तसेच एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश. टोळीवर ७ गंभीर गुन्ह्यांची नोंद.
५) अंबादास उर्फ सोन्या राठोड टोळी (चिखली) टोळी प्रमुख, प्रमुख आरोपी : अफजल शाहा, मोहम्मद सिद्दीकी उर्फ लालू चौधरी, विशाल उर्फ बंटी गौतम, अरुण उर्फ शिवा गौतम व इतर. टोळीवर ३ गंभीर गुन्ह्यांची नोंद.
या सर्व टोळ्यांवर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी, जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा, तोडफोड, जाळपोळ आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याचे आरोप आहेत.
पोलिसांच्या तपासात या टोळ्या आर्थिक फायद्यासाठी आणि वर्चस्व राखण्यासाठी संघटित स्वरूपात गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांची संघटित गुन्हेगारीविरोधात धडक मोहीम सुरू असून, २०२६ मध्ये आतापर्यंत २७ टोळ्यांमधील १५० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.





