महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

रावेत परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

रावेत परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

रावेत :प्रतिनिधी : प्रसाद गव्हाणे
पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील विविध रस्त्यांवर, सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर तसेच चौकांमध्ये भटक्या कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत आहेत.
रस्त्याने जाणारे पादचारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा कुत्रे वाहनांच्या मागे धावत असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत.
या समस्येकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवावे, कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करावे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!