E-Paperदुनियामहाराष्ट्रयुवालोकल न्यूज़

कर्णबधिर विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा; अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेतर्फे ५ वृक्षांचे वृक्षारोपण.

कर्णबधिर विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा; अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेतर्फे ५ वृक्षांचे वृक्षारोपण.

पुणे, १५ ऑगस्ट २०२६ :
अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेतर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, विकास नगर, वानवडी, पुणे येथील कर्णबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. हौशीला प्रसाद दुबे साहेब, राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. श्री. कुलदीप सिंह साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री. बाबा गोलंदाज साहेब, महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष मा. श्री. जयेश जोजरे सर आणि महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार ॲड. सौ. अंजली रानडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील सुमारे ७० कर्णबधिर विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत काही वेळ संवाद साधत मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

यानंतर विद्यार्थ्यांच्या सहभागातून परिसरात “एक पेड शहीद के नाम, या उपक्रमा अंतर्गत तब्बल ५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच विशेष विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेमाची भावना निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक घाटगे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक करून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व प्रोत्साहन केले.

कार्यक्रमास नसीरुद्दीन पिरजादे – पश्चिम महाराष्ट्र सचिव, अल्ताफ शेख – पुणे जिल्हा उपाध्यक्ष, शबाना खान – पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष, सारा सौदागर – पुणे महिला शहर अध्यक्ष, किरण शेख – पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष, शोहाब शेख – कोंढवा विभाग प्रमुख, शिरीन शेख – पुणे जिल्हा महिला सचिव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!