आकुर्डी रेल्वे स्टेशन रोडवर भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

पिंपरी-चिंचवड : आकुर्डी रेल्वे स्टेशन रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असतानाच कुत्र्यांचे कळप रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः सायंकाळच्या वेळी या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अचानक कुत्रे वाहनांसमोर आल्यास अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
या समस्येकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
सदर ची घटना निगड़ी प्राधिकरण सेक्टर २६ इथून असुन त्यावर लवकरात लवकर योग्य ती करवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




