पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक फलकावर जाहिरातींचा कब्जा !

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड परिसरातील सायकल लेन दर्शविणारा महत्त्वाचा वाहतूक फलक जाहिरातींचे पोस्टर्स व स्टिकर्स लावून झाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतूक नियम व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सार्वजनिक फलकांचा वापर जाहिरातींसाठी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सार्वजनिक वाहतूक फलकावर अशा प्रकारे जाहिराती लावल्याने सायकलस्वार तसेच इतर वाहनचालकांना आवश्यक वाहतूक सूचना स्पष्टपणे दिसत नाहीत. यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अडचण निर्माण होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
(ठिकाण : आकुर्डी रेल्वे स्टेशन, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२६)
या प्रकाराची संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वाहतूक फलकावरील सर्व पोस्टर्स व जाहिराती हटवाव्यात, तसेच सार्वजनिक वाहतूक फलक खराब करणाऱ्या अथवा त्यावर अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांवर नियमानुसार योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.




