राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक व धक्काबुक्की; महाराष्ट्रात संतापाची लाट
संग्राम भांडारे व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी; “लोकशाहीला काळिमा फासणारी घटना”

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा सहकारी विकास लवांडे यांच्यावर संग्राम भांडारे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आलेली धक्काबुक्की, शाईफेक आणि दमदाटीची घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेचा विविध स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, ही घटना लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
राजकीय मतभेदांना हिंसक स्वरूप देणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे असून, अशा प्रवृत्तींवर वेळीच आळा बसणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. संबंधितांवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल करून दोषींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, आता राज्याचे गृहमंत्री या प्रकरणात निष्पक्ष कारवाई करून संबंधितांवर कठोर पावले उचलतात की अशा प्रवृत्तींना राजकीय संरक्षण दिले जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. “कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही,” असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.




