E-Paperhttps://mvsnews.info/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifक्राइम
रावेतमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ
रावेत, पिंपरी-चिंचवड:
दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रावेत परिसरातील धर्मराज चौक, इस्कॉन टेम्पल रोड येथील पाण्याच्या टाकीसमोर रेल्वे साईटलगत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती परिसरात समजताच नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटली आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
फोटोतील व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास किंवा त्यांच्या नातेवाईकांना काही माहिती असल्यास तात्काळ रावेत पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी : प्रसाद गव्हाणे- पिंपरी-चिंचवड शहार)




