E-Paperलोकल न्यूज़

वैष्णवी मंदिर, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात विद्युत खांबांची दुरवस्था; शासकीय मालमत्तेची चोरी की प्रशासनाचे दुर्लक्ष?

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी- प्रसाद गव्हाणे): वैष्णवी मंदिर, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील पदपथावर असलेल्या विद्युत खांबांची अत्यंत दयनीय अवस्था निदर्शनास आली आहे. काही विद्युत खांबांची झाकणे उघडी असून, आतील वायरिंग आणि विद्युत उपकरणे उघड्यावर पडलेली दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, विद्युत खांबांमधील काही साहित्य चोरीला गेले आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शासकीय मालमत्तेची अशा प्रकारे हानी होत असताना संबंधित महानगरपालिका प्रशासन आणि विद्युत विभाग नेमके काय करत आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पदपथावरून दररोज लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते. अशा उघड्या विद्युत खांबांमुळे विजेचा धक्का लागण्याची दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून उघड्या विद्युत खांबांची दुरुस्ती करावी, चोरी झाल्याची शक्यता असल्यास चौकशी करावी आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आता तरी महानगरपालिका प्रशासन जागे होणार का? की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!